कारंजा : गावातील मुलभुत सुविधा अंतर्गत गावाचा विकास व्हावा याकरीता शासनाकडून निधी प्राप्त होतो. मात्र मनभा येथील ठेकेदाराने सिमेंट रस्त्याचे काम करण्याकरीता शासकीयअंदाजपत्रकाची कोणतेही मजुंरात नसतांनाच काम केल्याचा प्रकार मनभा ग्राम पंचायत माहीतीच्या अधिकारात उघडकीस आला. मनभा येथील ग्राम पंचायत सदस्य राजू उ. इचे यांनी दाखल केलेल्या माहीतीच्या अधिकारात मागीतलेल्या माहीतीमध्ये मनभा गावात सन २0१३ ते २0१४ मध्ये दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाकरीता २ लाख रुपये मजूर झाले होते. हे काम करण्याकरीता कोणतेही शासकीय आदेश कींवा अंदाजपत्रक दिले नसतांनाच सिंमेट रस्त्याचे काम केल्याचा प्रकार माहीतीच्या अधिकारात प्राप्त झाला आहे. या कामाची दखल उप आयुक्त विकास अमरावती यांनी घेउन दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मनभा व्दारे रोडचे बांधकाम वर्क ऑर्डर न काढता व कुठलाही आराखडा न करता मनमानी करुन करण्यात आले या बाबत चौकशी करण्यात आदेश देण्यात आले असल्याचे माहीती माहीतीच्या अधिकाराचे तक्रारकर्ते इचे यांनी पत्रकाव्दारे केली आहे.
अंदाजपत्रक मंजुर नसतांना काम
By admin | Updated: August 9, 2014 21:58 IST