शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

त्यांच्या मैत्रीला खरचं कुणाची दृष्ट लागली का ?

By admin | Updated: August 5, 2014 20:35 IST

३ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या मैत्रीचा अखेरचा दिवस ठरला.

रिसोड: 'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा' हे कधी कुणी सांगू शकेला काय. तसचं मैत्रीचं आहे. आपल्या मैत्रीचा धागा अजून घट्ट करण्यासाठी मैत्रीदिनाच्या दिवशी एकमेकींना शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यांच्या मैत्रीला कुणाची दृष्ट लागली देव जाणो. ३ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या मैत्रीचा अखेरचा दिवस ठरला. मन सुन्न करणार्‍या या घटनेने आजही रिसोड शहर शोककळेत चिंब डूबून गेले आहे.रिसोड शहरातील शिवाणी गजानन साळेगावकर, प्रज्ञा विलास मोरे , ऐश्‍वर्या गणेश गवळी तिन्ही जिवलग मैत्रीण भारत माध्यमिक शाळेत इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होत्या. मनमिळाऊ, धाडसी, हुशार, विद्यार्थीनी म्हणून त्यांचे सर्वत्र नावलौकीक होते. तीन्ही मैत्रीणींनी फ्रेडशीप डे चे औचित्य साधून रविवारला ऐश्‍वर्याच्या शेतात जावून पोहणे शिकण्याचे नियोजन केले होते. त्या अनुषंगाने प्रज्ञा मोरे हीने सोबत बॅग सुध्दा घेतली होती. त्यामध्ये पोहणे शिकण्यकारिता अतिरिक्त कपडे सुध्दा आणले होते. ऐश्‍वर्या गवळी यांच्या फॉर्म हाऊसवरील शेतात प्रज्ञा व शिवाणी सकाळी साडे अकराच्या दरम्यान नियोजित वेळेनूसार पोहचल्या तीन्ही मैत्रीनी एकत्र जमल्यानंतर तिघींचा संयुक्त निर्णय घेवून ऐश्‍वर्या ही तिच्या वडिलाकडे फार्म हाऊस समोरील शेततळयात पोहण्याची परवानगी घेण्यासाठी गेली. ऐश्‍वर्याने वडिलांच्या कानावर सदर बाब टाकताच तिच्या वडीलांनी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला. पोहण्याचा हट्ट धरु नकोस असा सूचक उपदेश ऐश्‍वर्याचे वडिल यांनी तिघी मैत्रीणींना दिला. या उपरांत एश्‍वर्याच्या आईने तिघींसाठी पोहयांचा फराळ केला. तिघी मैत्रीणींनी फराळ केल्या नंतर संपूर्ण शेताला व शेततळयाच्या सभोवताल फेरफटका मारला . पोहण्याची तीव्र इच्छा मनात असलेल्या तिघींना पुन्हा एकदा ऐश्‍वर्याच्या वडिलाकडे पोहण्याची परवानगी मिळावी या उद्देशाने घेवून गेली. असे एक वेळा नव्हे तर या तिघी मैत्रीणी तब्बल चार वेळा गणेश गवळी यांच्याकडे पोहण्याची परवानगी मागण्यास गेल्या होत्या. मैत्रीणींच्या वडिलांनी चार वेळा स्पष्ट शब्दात नकार दिलेला असतांनाही या तिघी मैत्रीणींना पोहणे शिकण्याची अंतर मनातील इच्छा रोखता आली नाही. तिन्ही मैत्रीणी पोहण्यात तरबेज नसल्याने पाण्यात डुबून एकमेकींना वाचविण्यात त्यांना दुदैवी अंत झाला. घटनेची वार्ता शहरात पसरताच सर्वत्र स्मशान शांतता पसरली. कुटूंबातील सदस्याचे दु:ख पाहुन हृदयाचे पाणी पाणी होत होते. जणू अभाळच कोसळल्याचे जाणवत होते. कुटूंबातील शोक मग्न सदस्यांना सात्वनपर धीर देणे सुध्दा उपस्थितांना कठीण जात होते. मृद स्वभावी, मितभाषी, हुशार विद्यार्थीनींचा असा दुर्देवी अंत पाहूण उपस्थितांचे डोळे पाणावले होते. दरम्यान रविवारला रात्री ऐश्‍वर्या गणेश गवळी, हिचेवर तिच्या फॉर्महाऊस च्या शिवारात तर शिवाणी गजानन साळेगावकर हिचेवर वाणी स्मशान भूमीमध्ये , प्रज्ञात विलास मोरे हिच्यावर दलित स्मशानभूमीमध्ये अंतीम संस्कार करण्यात आला. यावेळी तिन्ही मैत्रीणींच्या अंत्यविधी करिता हजारोंच्या जनसमुदाय एकवटला होता.या तिन मैत्रिणींचा मृत्यू झाल्याची घटना कानावर येताच प्रत्येकांना ह्यमरते दम तकह्ण या चित्रपटातील ह्यछोडेंगे ना हम तेरा साथ हो साथी मरते दम तरह्ण या गिताच्या ओळी आपुसकच आठवल्याने भावूक झालेल्या शहरवासीयांनी आपल्या अश्रूंची वाट मोकळी केली.