किन्हीराजा : ङ्म्रीसंत नारायण बाबा संस्थान खंडाळा शिंदे ते मुंगसाजी महाराज धामणगाव देव येथे जाणार्या पायदळ दिंडीचे ७ ऑगस्ट रोजी येथील कमलेश्वरी माता मंदिरावर स्वागत करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले. ही पायदळ दिंडी ६ ऑगस्ट रोजी खंडाळा शिंदे येथून निघाली असून शिरपूर मालेगाव नागरदास खेर्डा जऊळका, किन्हीराजा येथे मुक्कामी आल्यानंतर येथील पवन जैस्वाल यांनी कमलेश्वरी माता मंदिरावर सर्व पायदळ दिंडीतील भाविक भक्तांना एकादशी निमित्त फराळ व चहापाणी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रात्री मंदिरात भजन किर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच सकाळी गावातून मिरवणुक काढण्यात आली. गावात मिरवणुकी ददरम्यान घरोघरी पुजा अर्चा करुन या पायदळ दिंडीचे स्वागत करण्यात आले. व पायदळ दिंडीचे शेलुबाजार कडै प्रस्थान झाले ही दिंडी शेलुबाजार वरुन तर्हाळा, पेडगाव, तपोवन, वाई कारंजा, सोमठाणा, बोदेगाव तेलगव्हाण या मार्गाने धामणगाव देव येथे जाणार असून दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत काल्याचे किर्तन व नंतर नारायण शिंदे यांचेकडून धामणगाव येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. किन्हीराजा येथे या पालखीचे स्वागत करण्याकरिता कमलेश्वरी माता संस्थानचे अध्यक्ष उध्दव गोडे पवन जैस्वाल, मोहन जैस्वाल नयन जैस्वाल, राम खुरसुडे, सुनिल गोदमले, इत्यादी उपस्थित होते.
नारायणबाबा पायदळ दिंडीचे स्वागत
By admin | Updated: August 10, 2014 22:40 IST