शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

परीक्षार्थींना शुल्क परताव्याची प्रतीक्षा !

By admin | Updated: August 18, 2016 00:48 IST

शिक्षण विभागाने आता मागविली माहिती : दुष्काळी मदतीचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळालाच नाही.

संतोष वानखडेवाशिम, दि. १७: दुष्काळग्रस्त वाशिम जिल्ह्यातील दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांंच्या परीक्षा शुल्काचा परतावा अद्यापही मिळाला नाही. संतापजनक प्रकार म्हणजे आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांंची माहिती मागविण्याला सुरूवात केली आहे.५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ करण्याबरोबरच अन्य प्रकारच्या सवलती दिल्या जातात. जिल्ह्यातील सर्व गावांची सन २0१५-१६ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी आली होती. खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी आलेल्या गावांना महाराष्ट्र शासनाने २३ मार्च २0१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये जमिन महसुलात सुट, वीज बिलात ३३.५ टक्के इतकी सुट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी सवलतींचा समावेश आहे. या निर्णयानुसार दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ झालेले आहे. वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून विलंबाने जाहिर झाला. तोपर्यंंत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंनी परीक्षा शुल्काचा भरणा केला होता. परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांंना सदर शुल्क परत मिळणे अनिवार्य आहे. यावर्षी १६ हजार १८१ विद्यार्थ्यांंनी बारावीची परीक्षा दिली तर २0 हजार ९८२ विद्यार्थ्यांंनी दहावीची परीक्षा दिली. दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क रकमेत फरक आहे. बारावीचे परीक्षा शुल्क कला, वाणिज्य व विज्ञान या शाखानिहाय आकारले जाते. बारावीचे परीक्षा शुल्क सरासरी ४00 रुपये गृहित धरले तर एकूण ६४ लाख ७२ हजार ४00 रुपये अशी रक्कम होते. दहावीचे परीक्षा शुल्क सरासरी २४0 रुपये गृहित धरले तर ५0 लाख ३५ हजार ६८0 रुपये अशी रक्कम होते. दोन्ही मिळून एकूण एक कोटी १५ लाख आठ हजार ८0 रुपये परीक्षा शुल्काची रक्कम होते. यापैकी किती विद्यार्थ्यांंना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे, याचा लेखाजोखा शिक्षण विभागाने यापूर्वीच संकलीत करणे अपेक्षीत होते. मात्र, तसा प्रयत्न झाला नसल्याने पात्र विद्यार्थ्यांंंचे परीक्षा शुल्क शासन दरबारी पडून आहे. दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांंच्या शुल्काची माहिती ऑगस्ट महिन्यात संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक आणि त्यानंतर शिक्षण संचालकांकडे सादर होईल. या प्रक्रियेला किमान एक महिना कालावधी लागणार असल्याचे सांगितले जाते. तोपर्यंंंत पात्र विद्यार्थ्यांंंसमोर प्रतिक्षा करण्यापलिकडे दुसरा पर्याय नाही.