मंगरूळपीर: यंदाच्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील गाव तलाव कोरडीच असल्याचे भयावह चित्र बघावयास मिळत आहे अशीच परिस्थीती राहल्यास तालुक्याला पाणी टंचाईच्या उंबरट्यावर येण्यास वेळ लागणार नाही.सद्याची दुष्काळी परिस्थीती पाहता तालुका दुष्काळ घोषीत करा अशी मागणी वाढली आहे मंगरूळपीर तालुक्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी अत्यंत कमी आहे.पावसाच्या उघडझाप चालु असल्याने आता पर्यंत दमदार पाऊस पडला नाही.दोन महिने उलटुनही अपेक्षीत पाऊस झाला नाही त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील गाव तलाव कोरडीच पडलेली आहे.शिवाय सिंचन प्रकल्प आहे त्याच अवस्थेत आहेत. परिणामी विहीरी तसेच हापंपाच्या पाण्याच्या पातळी खालावत चालली आहे माळराणातील नदी नाले तहानलेली असल्याने गुरा ढोरांचा पिण्याचा पाण्याचा भिषण प्रश्न्न शेतकर्यांसमोर उभा झाला आहे.अत्यल्प पावसामुळे शेतकरी चिंतातुर असतांना गुरांच्या चार्याचा प्रश्न्न बिकट होत चालला आहे. चहुबाजुने बळीराजा घेरल्या गेला असुन तिबार पेरण्यामुळे आर्थीक अडचणीत सापडलेल्या कष्टकरी शेतकर्यांना शासनाच्या मदतीची प्रतिक्षा आहे.पेरण्या उलटल्यावर सर्व्हेक्षण करण्या संदर्भात कुठलीच प्रक्रीया सुरू झाली नाही.तालुक्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली असुन त्याचा बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे.शासनाने दुबार,तिबार पेरण्याचा सर्व्हेक्षण करून आर्थीक मदती बाबत कारवाई करावी अशी मागणी होत आहे
मंगरूळपीर तालुक्यातील गाव तलाव कोरडेच
By admin | Updated: August 9, 2014 22:44 IST