कारखेडा: घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवेचे व्रत घेतलेल्या येथील निळकंठ यादवराव देशमुख या ८४ वर्षीय वृद्धाची धडपड तरूणाईला प्रेरणा देणारी आहे. त्यांनी अख्ये आयुष्य शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून गोरगरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजकार्याची आवड असलेला हा समाजसेवक गोरगरीबांची कामे घेवून मानोर्यातील कुठल्याही शासकीय कार्यालयात दिसून पडतो. निराधार योजना, अतवृष्टी, लाल्याचे अनुदान, गारपीट, भिंतीची पडझड अशा अनेक प्रकारच्या शासनाच्या योजना, विविध विषयावरील अनुदान गोरगरीबांना मिळावे याकरिता त्यांची धडपड असते. लोकशाही पद्धतीने निवडणूक अस्तित्वात आली तेव्हापासून आमदार, खासदार, जि.प.सदस्य किंवा अधिकारी यांना भेटून ते गावाची व्यथा मांडतात. ग्रा.पं.ची मासिक सभा असो की ग्रामसभा त्यामध्ये गोरगरीबांच्या हिताची एक ना एक मागणी ते करतातच. सध्या त्यांच्या डोक्यात ह्यअपंगासाठी घरकुलह्ण मिळावे हा मुद्दा ठाण मांडून आहे. अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करणार्या निळकंठरावांकडे स्वत:च्या नावे केवळ अडीच एकर शेती आहे. अख्ख्या आयुष्यात त्यांनी घरावरचा टिन सुद्धा बदलला नाही. स्वखर्चाने जनतेची कामे करण्यास हा माणूस आहे. गावासाठी जीवाचं राण करणारा हा माणूस कधीच सन्मानित सुद्धा झाला नाही. त्यांना गावचे ह्यअण्णा हजारेह्ण म्हटले जाते. दरम्यान त्यांच्या समाजसेवेबद्दल त्यांच्याशी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आपण हे कार्य अकोला जिल्हा होता तेव्हापासून करीत आहे. २५ ते ३0 वर्षापूर्वी एक वेळा अविरोध ग्रा.पं.सदस्य झालो होतो. पद किंवा सन्मान हा विषय आपल्या डोक्यातच नव्हता असे सांगीतले. आजही त्यांना पुरेसे ऐकायला येत नाही पण समाजासाठी काही तरी करण्याची धडपड आजही कायम आहे. अशा जिंदादिल वृद्धाकडून तरूणांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे.
जिंदादिल वृद्धाची असामान्य धडपड
By admin | Updated: July 10, 2014 22:38 IST