कारंजा लाड (वाशिम) : कारंजा-मानोरा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींनी लहान उद्योगाकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे बेरोजगारांचे प्रमाण वाढले, असे मत भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे ४ ऑक्टोबर रोजी आयोजित जाहीरसभेत व्यक्त केले. भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कारंजा येथील विद्याभारती विद्यालयाच्या समोरील कॅ न्सर रिलिफ सेंटरच्या मैदानावर रविवार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले, की, विचारात बदल झाला, तर प्रगती होईल. शोषित, पिडीत व शेतकर्यांना न्याय देण्यासाठी भारीप बमसंच्या पाठीशी राहा, असेही आंबेडकर म्हणाले. सदर सभेचे प्रास्ताविक मो. युसूफ पुंजानी यांनी, संचालन जिल्हा महासचिव राजाभाऊ चव्हाण यांनी, तर आभारप्रदर्शन अशोक मोहोड यांनी केले.
लहान उद्योगांना वाव न मिळाल्याने बेरोजगारी वाढली!
By admin | Updated: October 6, 2014 00:48 IST