तळप बु. (वाशिम) : परिसरात वन्यप्राण्यांनी हैदास घातला असून आपली पीके वाचविण्यासाठी शे तकर्यांना रात्रीच्यावेळी शेतात जागल करावी लागत आहे.तळप गावाला लागून मोठे जंगल आहे. त्यामध्ये वन्यप्राणी असून रात्रीच्यावेळी जंगलातील रोही, हरणे, डूकरे शेतामध्ये शिरतात आणि पिकांची नासाडी करतात. ज्वारीचे पीक वन्यप्राणी पुर्णपणे नष्ट करीत असल्यामुळे शेतकर्यांनी ज्वारी पेरणे सोडून दिले आहे. आपले पीक वाचविण्यासाठी जंगलालगतचे शेतकरी शेतात खोपडी बांधून जागल करतात. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
तळप बु.परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस
By admin | Updated: September 21, 2014 00:10 IST