शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अर्ज करूनही मिळेना ‘स्वाइप मशीन’!

By admin | Updated: April 20, 2017 02:02 IST

बँकांकडे हजारो अर्ज ‘पेंडिंग’ : ‘कॅशलेस’ धोरणाचा जिल्ह्यात उडाला बोजवारा; प्रशासनाचेही दुर्लक्ष

वाशिम : जिल्ह्यातील शेकडो व्यापाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडे ‘स्वाईप मशीन’ची मागणी करणारे अर्ज सादर केले; मात्र वारंवार बँकांचे उंबरठे झिजवूनही ही मशीन मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, शासन स्तरावरून अंगिकारण्यात आलेल्या ‘कॅशलेस’ धोरणाचा बँकांच्या उदासीनतेमुळेच बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे.केंद्र शासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये चलनातून ५०० व हजारच्या नोटांवर बंदी लादली. त्यानंतरच्या काळात ‘कॅशलेस’ धोरण अंगिकारण्याबाबत युद्धस्तरावर जनजागृती देखील करण्यात आली. मात्र, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यासह पुरेशा सुविधा पुरविण्याकामी शासन, प्रशासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या शहरांसह अनसिंग, शिरपूरसारख्या मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांनी डिसेंबर २०१६ पासून त्यांचे खाते असणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांकडे ‘स्वाइप मशीन’ मिळणेबाबत अर्ज सादर केलेले आहेत; मात्र पाच महिने उलटूनही जिल्ह्याकरिता ‘स्वाइप मशीन’ उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. एकट्या वाशिम शहरातील पाटणी चौकात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ८०० पेक्षा अधिक ‘स्वाइप मशीन’ची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यात आजमितीस उण्यापुऱ्या ३५ ते ४० मशीन कार्यान्वित झाल्या आहेत. या गंभीर बाबीमुळे ‘कॅशलेस’ धोरणाचा पूर्णत: बट्ट्याबोळ उडाला असून, व्यावसायिकांमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. ‘एटीएम’मध्ये ठणठणाट; व्यापाऱ्यांच्या ‘ट्रान्झेक्शन’वर बँकांचा कारभार!जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकांचे तब्बल ६२ ‘एटीएम’ कार्यान्वित आहेत; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यातील बहुतांश ‘एटीएम’मध्ये पैशांचा ठणठणाट असून, ही विदारक परिस्थिती आजही कायम आहे. बँकांमधील व्यवहार बंद झाल्यानंतर ऐनवेळी पैशांची निकड भासल्यास नागरिक ‘एटीएम’वर धाव घेत आहेत; परंतु परिसरातील सर्व एटीएम पिंजून काढल्यानंतरही कुठेच पैसे मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे ‘एटीएम’बंदच्या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना बँकांमध्येही अपेक्षित रकमांचा विड्रॉल दिला जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ‘आरबीआय’कडूनच पुरेशा प्रमाणात ‘कॅश’ मिळत नसल्यामुळे ही समस्या भेडसावत असल्याचे काही बँकांच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत अधिकांश राष्ट्रीयीकृत बँका स्थानिक पातळीवरील व्यापाऱ्यांच्या दैनंदिन ‘ट्रान्झेक्शन’वरच आपला कारभार पाहत असल्याचे दिसून येत आहे.व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये लागणाऱ्या ‘स्वाइप मशीन’चा वरिष्ठ पातळीवरूनच पुरवठा नसल्यामुळे बँकादेखील हतबल झाल्या आहेत; परंतु लवकरच हा प्रश्न निकाली निघून व्यावसायिकांना पुरेशा प्रमाणात मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्ह्यातील ७७४ राशन दुकाने व १३८१ केरोसिन विक्रेत्याही ‘स्वाइप मशीन’ देण्याचे नियोजन आहे. - शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम