शिखरचंद बागरेचा / वाशिमवाशिम येथील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळ सर्वात जुने असून या मंडळाला जवळपास ९७ वर्ष पूर्ण होत आहेत. या मंडळातर्फे आयोजित सांस्कृतीक, सामाजिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केल्या जाते. यामध्ये आजपर्यंत अनेक वक्ते, नेत्यांसह कलाकार मंडळी येऊन गेली आहेत. यामध्ये सनई वादक बिस्मीला खॉ , स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकनायक बापुजी अणे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे , मुज्जफर हुसेन यांच्यासह शेकडो जणांचा समावेश आहे.वाशिम येथे लोकमान्य टिळक ८ फेब्रुवारी १९१८ रोजी वाशिम येथे आले असता भाऊसाहेब साने, विनायकराव गोखले, नारायणराव देशमुख, अँड. मुजूमदार यांनी ङ्म्री गणेशोत्सवाचा सुरवात केली. तेव्हापासूनच राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाद्वारे दरवर्षी प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू आहे. लोकमान्य टिळक ८ फेब्रुवारी १९१८ रोजी वाशिम येथे गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करण्यासाठी आले होते. त्यानंतर २९ नोव्हेंबर १९३७ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वाशिम येथील टिळक स्मारकाचे उद्घाटन केले. त्यानंतर सनईवादक बिस्मिला खॉ यांनी वाशिम येथे सनईवादन केले होते. आजच्या घडीला ही धुरा दिलीप जोशी, योगेश देशपांडे, नाना पाठक यांच्यासह अनेक युवक व पदाधिकारी पार पाडत आहेत.
गणेशोत्सव मंडळात सनईवादक बिस्मिला खॉ यांनी केले होते सनईवादन
By admin | Updated: September 10, 2014 00:18 IST