वाशिम :महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून लंपास करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. प्रसंगावधान राखुन महिलेने चोरट्याला हातातील केटली मारल्याने चोरट्यांचा डाव फसला. या चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. ही घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पुसद नाका परिसरात घडली. जवाहर कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या मीरा सुनील बायनवार मैत्रिणीसोबत लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गेली होती. साहित्य खरेदी करून घरी परत जात होती. दरम्यान, पुसद नाका परिसरात अचानक दोन युवक मोटारसायकलीने पाठीमागुन आले. त्यांनी मीरा बायनवार यांच्या गळ्या तील सोन्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला असता बायनवार यांच्या मैत्रिणीने प्रसंगावधान राखून हा तामधील केटली चोरट्याच्या तोंडावर मारल्याने चोरट्यांचा डाव फसला. या महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना हॉटेल रॉयल पॅलेसनजिक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यामध्ये शेख इम्रान शेख मोहम्मद व ममजान खान दौलत खान दोघेही रा. नालसाबपुरा या दोघांचा समावेश आहे. या महिलेच्या तक्रारीहून उपरोक्त दोघांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सोनसाखळी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: January 31, 2015 00:45 IST