धानोरा-कुंभी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. त्यामुळे वाहन चालविण्याची कसरतच चालकांना करावी लागत आहे. खड्डे चुकवून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालक करीत असून, यात एखादवेळी नियंत्रण सुटल्यास समोरच्या वाहनाला धडक लागून अपघात घडण्याची भीती आहे. त्यात या मार्गावर दुचाकीच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. एखावेळी येथे जीवित हानी होण्याची भीती आहे. त्यामुळे आसेगांव सर्कलमधील सरपंच संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर करीत या रस्त्याच्या दुरुस्ती मागणी करण्यात आली. तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याच्या इशाराही देण्यात आला. यावेळी आसेगावचे सरपंच गजानन मनवर, पं.स. सदस्य अनंत शेळके, शिवणीचे सरपंच डॉ.भगवान भेंडेकर, उपसरपंच केशवराव श्रीराम चौधरी, वसंतवाडीचे सरपंच प्रेमसिंग रामधन राठोड, बालाजी खोटे, विष्णू फड, भास्कर इळे, नीळकंठ भोजराज आडे आणि सुभाष कावरे आदिंची उपस्थिती होती.
रस्ता दुरुस्तीसाठी सरपंच संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST