अनसिंग (वाशिम) : येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये असलेले विद्युत रोहित्राचा स्फोट झाल्याची घटना बुधवार १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. गावकर्यांच्या सतर्कतेपणामुळे जीवितहानी टळली. यावेळी सदस्य आयुबखॉ पठाण, उपसभापती इमरान कुरेशी, शे. जलीलभाई, गफार शे. सलार, शे. अजार, शे. बाबर, शे. रशीद तथा उपस्थित गावकर्यांनी कर्तव्यदक्षता पाळून अचानक लागलेली आग विझवून नुकसान होऊ नये या करिता संपूर्ण गावातील विद्युत पुरवठा खंडित केला. गावकर्यांनी लागलेल्या आगीवर पाणी टाकून गावामध्ये आग पसरणार नाही याकरिता मदत केली. लोकांच्या सहकार्याचा भावनेमुळे गावाला लागणारी आग अटोक्यात आली; मात्र विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता या ठिकाणी आलेच नाही.
अनसिंगमध्ये विद्युत रोहित्राचा स्फोट
By admin | Updated: September 19, 2014 01:32 IST