देपूळ : वाशिम तहसिल अंतर्गत येणार्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील तीन पैकी दोन लिपीकांना रुजू होउन एक महिना उलटत असताना त्यांना पुर्वीच्या लिपिकांकडून पदभार न मिळाल्याने या विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या संजय गांधी निराधार योजना, ङ्म्रावण बाळ योजना अपंग निराधार इत्यादी योजनेचे काम पुर्णत: खोळंबल्याचे चित्र आहे. याप्रकारामुळे सर्व योजनेतील पात्र १७ हजार लाभार्थीचे मानधन अर्थसाहाय्य खोळंबले आहे. अपंग निराधार, विधवा, अर्थसहाय्यासाठी तहसिलवर चकरा मारित आहेत. यासंदर्भात संजय गांधी निराधार योजना समितीचे नायब तहसीलदार जी.कदम यांच्याशी संपर्क साधला असता आपण नुकताच या विभागाचा पदभार घेतला आहे त्यामुळे त्या लिपिकाने पदभार न देण्याचे कारण सांगता येणार नाही. परंतु आपण आप पावोतो पदभार का दिला नाही या बाबत पदभार न देणार्या लिपिकाला नोटीस देणार असल्याचे सांगितले.
१८ हजार लाभार्थीचे अर्थ्यसहाय्य लांबणीवर
By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST