कारंजा (जि. वाशिम): शहरालगतच्या शहा फाटा परिसरातील राधास्वामी सत्संगच्या बाजूला सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींसह ताश पत्ते आणि अडीच हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. शहराला लागूनच असलेल्या शहा फाट्याजवळ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आरोपी किशोर देविदास चतुरकर (मूर्तिजापूर), हनुमान विष्णू जाधव (गिर्डा), विनोद किसन जाधव (गिर्डा), तसेच शे. साबीर शे. मुस्लीम (शहा) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून अडीच हजार रुपये रोख आणि ५२ ताश पत्ते, असा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध १२ जुगार अँक्टनुसार कारवाई केली.
जुगारावर पोलिसांची धाड
By admin | Updated: January 26, 2015 01:12 IST