शिरपूर जैन: मानव विकास मिशन अंतर्गत मुदतबाह्य औषधीचे वाटप केल्याची धक्कादायक बाब ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. ही घटना शिरपुर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ३१ जुलै रोजी घडली असून आरोग्य विभागाचा गलथान कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. मानव विकास मिशन अंतर्गत कार्यक्रमामध्ये नवजात बालकांना बेस्टोकेम नावाची मुदतबाह्य औषधी लहान बालकांना वाटप करण्यात आले. मात्र, ही धक्कादायक बाब सात महिण्याची बालीका ङ्म्रध्दा कपिल भालेराव हीला उलटी झाल्याने उघडकीस आली. श्रध्दाचे आजोबा ग्राम पंचायत सदस्य अशोक शिवराम भालेराव यांनी औषधीची मुदत पाहली असता औषधी ड्रापवर निर्माण तारीख नोव्हेंबर २0१२ अशी होती. तर, ही औषधी निर्माण तारखेपासून १८ महिन्यापर्यंत वापरास योग्य असल्याचे लिहलेले होते. त्यामुळे माहे मे २0१४ मध्ये सदर औषधींची मुदत संपली असल्याचे लक्षात आले. आरोग्य विभागाने ३१ रुपये किंमत असलेली औषधी कोठून खरेदी केली व आरोग्य विभागाच्या स्टोअरमधून कधी प्राथमिक आरोग्य केंद्रवाला वाटप केली. याची चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान या बाबत जि.प.सदस्य मो.शाशिलाबी बागवान यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत माहिती दिली असून पं.स.सभापती लबडे, उपसभापती शिवाजी बकाल, पं.स.सदस्य संजय देशमुख, शिल्पा देशमुख, सुमनबाई गुडदे , गजानन शिंदे यांनी शिरपूर आरोग्य केंद्रात जाऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ंसंतोष बोरसे यांची भेट घेवून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांच्या माहितीनूसार गावातील एकूण ७ बालकांना मुदत संपलेली औषधी वाटण्यात आली होती.
बालकांना मुदतबाह्य औषधींचे वाटप
By admin | Updated: August 5, 2014 20:24 IST