मंगरुळपीर : एस टी बस चालकानी वनोजा फाट्यावर थांबा न घेतल्याने वैतागलेल्या शाळकरी विद्यार्थीनीने मंगरुळपीर आगार गाठून तक्रार बुकात नोंद केली आहे. शेलूबाजार येथून ये जा करणार्या वनोजा, भूर, तांदळी येथील शाळकरी मुलींसाठी एसटीचा थांबा द्यावा अशी मागणी १९ जुलै रोजी जि.प. सदस्य शिवदास पाटील यांनी मंगरुळपीर आगारप्रमुखांकडे केली होती. त्या मागणीची दखल घेत बस थांबा घेण्याच्या सुचना दिल्या गेल्या. मात्र काही बेजबाबदार चालक हेतुपुरस्सरपणे थांबा घेत नसल्यामुळे शाळकरी मुली त्रस्न झाल्या आहेत. ४ ऑगस्ट रोजी श्रावण सोमवार निमित्त सकाळून शाळा असल्याने वनोजा फाट्यावर भूर वनोजा येथील जवळपास २0 ते २५ मुली थांबलेल्या होत्या. तेवढय़ात सकाळी ७ वाजताचे सुमारास अकोल्यावरुन आलेली बस न थांबल्याने सदर मुलींना शाळेत जाता आले नाही. तेवढय़ात जि.प. सदस्य शिवदास पाटील त्या ठिकाणी आले त्यांना मुलींनी हकीकत कळल्यानंतर सर्व शाळकरी मुली मंगरुळपीर आगार गाठून सदर बस चालकाविरुद्ध तक्रार बुकात नोंद केली. यावेळी संबंधितांनी यापुढे शाळकरी विद्यार्थिनींची गैरसोय होणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले.
.. अन विद्यार्थिनींसाठी थांबली नाही बस
By admin | Updated: August 5, 2014 20:53 IST