खामगाव : स्वतंत्र विदर्भाची मागणी आज क्रांतीदिनी शहरात लावून धरण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य आणि खामगाव जिल्ह्याच्या मागणीसाठी युवक मोठय़ाप्रमाणात रस्त्यावर उतरले होते.बसस्थानकावर ह्यबस देखोह्ण आंदोलनानंतर ऑटो स्टॉपसह इतर ठिकाणी विदर्भाचे प्रतिकात्मक ह्यव्हीडीह्णअसे स्टिकर लावण्यात आले. यावेळी खामगाव जिल्ह्याचीही मागणी युवकांनी लावून धरली. खामगाव येथे यस(युथ एक्सलंस सव्र्हीस) या सामाजिक संघटनेच्या युवकांनी विदर्भ राज्यासह खामगाव जिल्ह्याची मागणी करीत तीव्र घोषणाबाजी केली. विदर्भ राज्य व विदर्भातील खामगाव हा १२ वा जिल्हा याचे प्रतिक म्हणून ह्यव्हीडी-१२ह्ण असे प्रतिकात्मक स्टिकर बस, ऑटो, मोटारसायकल आदी वाहनांवर चिटकविण्यात आले. नागपूर येथील जनमंच या सामाजिक संघटनेच्यावतीने ह्यलढा विदर्भाचाह्ण हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या संघटनेच्यावतीने विविध सामाजिक संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार खामगाव येथे ह्ययसह्ण या सामाजिक संघटनेच्यावतीने खामगाव बस स्थानकावर ह्यबस देखोह्ण तसेच विदर्भ बंध बांधो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गौरव चौधरी, राकेश शर्मा, सतिश देवगिरीकर, युवराज भेरडे, बंटी वानखडे, राष्ट्रपाल सिरसाट, प्रशांत वाकोडे, किशोर तराळ, हरिओम तायडे, विजय टेकाडे, अनिल देशमुख, गणेश पिंपळकार, सतीश मादेवार, गौरव इंगळे, प्रवीण राऊत, शरद वाडे, सुरज बोराखडे, प्रमोद भावसार, विक्की कुटे, मनोज जोध, शशिकांत डाहे, दत्तात्रय सरोदे, पप्पू राऊत, नीरज शेगोकार, मुकेश पुरोहित, गजानन जयस्वाल, सुरेश चिम, प्रमोद पहुरकर, अविनाश सडतकर, निखिलेश बेलोकार, कमलेश इंगळे यांच्यासह जनमंचचे पदाधिकारी सहभागी होते. बुलडाणा : केंद्रातील भाजपा सरकारने निवडणुकांपूर्वी वेगळ्या विदर्भ राज्याची घोषणा करावी, यासंदर्भात कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा, या मागणीसाठी बुलडाणा बसस्थानक परिसरात जनमंचतर्फे रेल देखो, बस देखो अभिनव आंदोलन करण्यात आले. वेगळया विदर्भाची मागणी अधिक तिव्र करण्यासाठी आंदोलनाचा पहिल्या टप्यात आज क्रांतीदिनी शांततामय मार्गाने रेल देखो, बस देखो अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात अँड. अशोक सावजी, बापुसाहेब मोरे, राणा चंदन, अँड.शर्वरी तुपकर,नरेंद्र लांजेवार, अनिल गव्हाळ, डिगांबर मावतकर, महेंद्र जाधव, निनाजी गावंडे, सदानंद पाटील, नितीन राजपूत आदींनी सहभाग घेतला.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन
By admin | Updated: August 10, 2014 01:25 IST