वाशिम : गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार ३१ जुलै रोजी नवनिर्माण फाउंडेशनतर्फे आयोजित यादें रफी गीत स्पर्धेला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. स्थानिक स्वागत लॉन, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा सोनाली जोगदंड तसेच अध्यक्षपद राजुभाउ चौधरी यांनी भुषविले. अतिथी म्हणून अशोक पत्की, राजाभैय्या पवार, अश्विनीताई पत्की, अनिल केंदळे, उपजिल्हाधिकारी डी.एम. गिरी यांनी दिपप्रज्वलन व सरस्वती पुजन करुन कार्यक्रमाचे विधिवत पुजा कावरे नागपूर व डॉ. प्रिया माळी अकोला यांनी परिक्षकांची उत्कृष्ट भूमिका पार पाडली. स्पर्धेची सुरुवात नवनिर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम बढेल व सर्व सदस्यांनी मिळून रविशंकर यांचे जय गुरु ओंकारा हे भजन गावून केली. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त नागपूरचे सुनिल वाघमारे यांनी गायिलेल्या दिन ढल जाए कहीं रात ना जाए या गीताला श्रोत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला. स्पर्धेत पुरुष गटातून स्पर्धेचे पहिले पारितोषिक ५00१ रु. नसिरोद्दीन शाह वाशिम, दुसरे पारितोषिक ४00१ रु. दिपचंद सारवान खामगाव, तिसरे पारितोषिक ३00१ रुपया सुनिल समुंद अमरावती यांनी पटकाविले. महिला गटातून पहिले पारितोषिक ५00१ रु. कु. रागिणी हजारे चंद्रपूर, दुसरे पारितोषिक ४00१ रसिका बोरकर अकोला, तिसरे पारितोषिक ३00१ रु. कल्याण वाघ खामगाव यांनी मिळविले. विशेष ज्युरी पुरस्कार २00१ सैय्यद अनिस वाशिम तर श्रोते प्रोत्साहनपर बक्षिस (ऑफ पब्लिक डिमांड) २00१ रु. वाचस्पती चंदेल नांदुरा यांना प्रदान करण्यात आले. तसेच वाशिमच्या स्थानिक कलाकारांकडून व्हाईस ऑफवाशिम पुरुष पारितोषिक २00१ रु. महेश बारटक्के तर व्हाईस ऑफ वाशिम महिला पुरस्कार २00१ रु. पल्लवी तायडे यांना देण्यात आला. अपंग स्पर्धकामधून अनिकेत खंडारे अकोला यांना २00१ रु. चे पुरस्कार देण्यात आले. बेस्ट क्लासिकल सिंगर पुरस्कार २00१ दीपिका वाघ रिसोड यांना देण्यात आला. पारितोषिक सोबत प्रमाणपत्र व विशेष शिल्ड देण्यात आले. ११ स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
यादें रफीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: August 4, 2014 00:29 IST