मालेगाव ( जि. वाशिम): तहसिल कार्यालयाचे मतदार नोंदणी अभियान पुर्ण झाले असून त्यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार मालेगाव तालुक्यात १६७८९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मालेगाव तालुक्यात १५५ केंद्रावर १५५ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती राज्यस्तरीय कार्यक्रमानुसार नवमतदार नोंदणी अभियान राबविले १ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत राबवलेल्या अभियानामध्ये नमुना ६ भरुन घेवून वयाची १८ वर्ष पुर्ण झालेल्या नवमतदारांची नोंद करण्यात आली तर जे मतदार मयत झालेले आहेत. काही स्थलांतर करुन दुसरीकडे गेले आहेत. तर काहींची नावे दुबार होती त्या सगळयांची नावे या मोहीमेत वगळण्यात आली आहेत. मालेगाव तालुक्यात ७३0७६ पुरुष मतदार होत तर ६५१२५ स्त्रि मतदार होते एकूण तालुक्यात १३८२0१ मतदार होते वयाची १८ वर्ष पूर्ण झालेले १६११ पुरुष मतदार तर १५१६ स्त्री मतदार मिळून ३१२७ नवमतदारांची नोंद करण्यात आली होती. तर २५६९ पुरुष व १९७0 स्त्री मतदार मिळून ४५३९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
मालेगाव तालुक्यात १६७८९ मतदार
By admin | Updated: January 29, 2015 00:30 IST