शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

मालेगाव बाजार समिती सभापतींविरुध्द अविश्‍वास पारित

By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST

सभापती विरोधात १३ संचालकांनी दाखल केला अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव.

मालेगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश शिंदे विरोधात सत्ताधारी गटाच्या ८ व विरोधी गटाच्या ५ अशा एकूण १३ सदस्यांनी दाखल केलेला अविश्‍वास प्रस्ताव आज १९ सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत पारित झाला आहे. मालेगाव बाजार समितीमध्ये मार्केट बचाव पॅनलचे वर्चस्व आहे. ८ महिन्यापूर्वी मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी सुरेश शिंदे यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यातच सभापती शिंदे हे संचालकांना विश्‍वासात घेवून चालत नाहीत, त्यांचा प्रशासनावर वचक नाही आदी विषयाचा ठपका ठेवण्याचे काम सत्ताधारी व विरोधी गटाच्या संचालकांमधून केले जाउ लागले. ९ सप्टेंबर रोजी १३ सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. दाखल प्रस्तावावर १९ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्यावतीने सभा घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १९ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेला विद्यमान सभापती शिंदेंसह पाच संचालक गैरहजर राहिले. तर प्रत्यक्ष सभेला १३ संचालक हजर होते. उपस्थित संचालकांनी हात उंचावून अविश्‍वास प्रस्तावाचे सर्मथन केल्याने सभाधिकार्‍यांनी सभापती शिंदेंविरुध्दचा अविश्‍वास प्रस्ताव १३ विरुध्द 0 मतांनी पारित झाल्याचे जाहीर केले. सभेच्या एकूणच कामकाजासाठी सहाय्यक निबंधक एस. पवार तर त्यांना सहाय्यक म्हणून भोयर, बाजार समिती सचिव प्रकाशराव कढणे यांनी यांनी सहकार्य केले.