वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने वाशिम आगारात प्रवाशांच्या प्रवासासाठी एकूण ५४ बसगाडया उपलब्ध करून दिल्या असून यापैकी केवळ ३0 बसगाडयांवरच संपूर्ण तालुक्यातील प्रवाशांचे ओझे वाहल्या जात आहेत. वाशिम तालुक्याची लोकसंख्या २ लाख ५५ हजार ४४२ आहे. वाशिम आगारामध्ये प्रवाशांची ने आण करण्यासाठी असलेल्या ५४ बसगाडयांमध्ये १0 बसेस मानव मिशनच्या आहेत. सदर मानव मिशनच्या बसेस केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरात असून सुट्टीच्या दिवशी या बसेस अन्य मार्गावर धावतात तर अन्य दहा बसेस दररोज कुठल्या ना कुठल्या कारणाने ब्रेकडाऊन असतात. याशिवाय तांत्रिक बिघाडामुळे सुध्दा काही बसेस दररोज आगारामध्ये जमा झालेल्या असतात अशा परिस्थितीत केवळ ३0 बसगाडयावरचं खर्या अर्थाने वाशिम आगाराचा कारभार सुरू असून प्रवाशांचे प्रवास सुरू आहे. वाशिम शहर हे जिल्हयाचे ठिकाण असून लांब पल्ल्याच्या तर बसेसचं नाहीत. लांब पल्ल्याच्या बसेसचे काम जास्त नसले तरी अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, नांदेड येथे जाण्यासाठी सुध्दा पुरेश्या बसेस नाहीत. जिल्हयानजिकचे हे शहर असल्याने नागरिकांना येथे येणे जाणे करावे लागते. दक्षिण उत्तर व पूर्व पश्चिम या दिशेला दळणवळणासाठी उपयुक्त व महत्वपूर्ण असा मार्ग वाशिम शहरातून गेला आहे. अशा महत्वपूर्ण असणार्या वाशिम आगारामध्ये प्रत्यक्ष रस्त्यावर धावणार्या बसगाडयांची संख्या अत्यल्प व लांब पल्ल्यांच्या बसेसअभावी प्रवाशांना नजिकच्या अकोला शहरातून आपला प्रवास करावा लागत आहे. वाशिम आगारात बसेसची संख्या कमी असली तरी एकूण ३0७ कर्मचारी आहेत. यामध्ये चालक १२९, वाहक, १२२, यांत्रिक ४१, वाहतूक नियंत्रक ६ व कारकून ९ यांचा समावेश आहे.ह्यबहुजन हिताय बहुजन सुखायह्ण चा मंत्र असणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम आगारातून प्रवांशासाठी लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात तर येतच नाहीत शिवाय जिल्हयातील गावांमध्येच तास न तास बसेस नाहीत.संबधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देवून सदर प्रकाराकडे लक्ष देवून प्रवाशांची गैरसाय टाळणे आवश्यक आहे. ** वाशिम बस थांब्यावर असुविधा मोठया प्रामणत असून बसण्यासाठी प्रवाशांना चांगले फलाट नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छ व सुयोग्य प्रसाधन गृह नाही, संपूर्ण बसस्थानक व परिसरात स्वच्छतेचा अभाव , मोकाट डुकरांचा सुळसुळाट व बसस्थानक परिसरातील खड्डे आदी असुविधांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाशिम आगाराच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर नेहमीच घाण पाणी राहत असल्याने प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात आगार प्रमुखांचे म्हणणे आहे की आम्ही बसस्थानकाची वारंवार स्वच्छता करण्याचा प्रयत्न करीत असतो व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतल्या जाते.
लाखो प्रवाशांचे ओझे केवळ ३0 बसगाडयांवर
By admin | Updated: August 6, 2014 00:18 IST