वाशिम :आगामी काळात होऊ घातलेल्या पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव तथा दसरा आदी सण गुण्यागोविंदाने साजरे करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी असे आवाहन प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांनी ११ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये केले. वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम सांगळे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक उदय सोयस्कर, शहर वाहतुकचे पोलिस अधिकारी श्रीराम पवार यांच्यासह नितिन उलेमाले, दिलीप काष्टे, आशिष कोठारी, अबरार मिर्झा, सलिम बेनीवाले, माधवराव अंभोरे, मुन्ना अग्रवाल, जगदिश बाहेकर, उज्वल देशमुख, पोलिस हवालदार रमेश पाटील, धनंजय ठाकरे, वासुदेव डाबेराव आदींची उपस्थिती होती. गेल्या दहा वर्षापासून जिल्हा शांतताप्रिय म्हणून नावलौकीकास आला आहे. हिच परंपरा यावषीर्ही कायम ठेवून शहरवासीयांनी शांततेत उत्सव साजरे करावेत. गणेश मिरवणूक वेळेत निघावी व वेळेत संपावी, शहरातील रस्त्याची डागडूजी गणेश उत्सवापूर्वी व्हावी, शहरात विखुरलेले केबल व विजेच्या तारा व्यवस्थित कराव्यात, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे, मोकाट जनावरे व कुत्रे यांचा बंदोबस्त करावा, अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, विसर्जन वेळेत व्हावे. शहरातील मुख्य रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे व कुठल्याही अफवा पसरणार नाही याची दक्षता घ्यावी यासह अनेक सूचना शांतता समिती सदस्यांनी बैठकीत मांडल्या.यावर उत्तर देताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले शांतता समिती सदस्यांच्या सूचना प्रशासन व पोलीस विभागाकडून अंमलात आणल्या जातील. उत्सवादरम्यान महिलांची छेड रोखण्यासाठी अतिरिक्त पथक निर्माण करण्यात येणार असून दारु विक्रीवर नियंत्रणासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या सहकायार्ने उपाययोजना केली जाईल. विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा असे आवाहनही पाटील यांनी केले. फेसबुक, व्हॉटस्अप, व्टिटर यासारख्या सोशल मिडीयावर नागरिकांनी कुणाच्या भावना दुखविल्या जातील असे फोटो, व्हिडीओ व पोस्ट करु नयेत. सोशल मिडीयाचे मॉनिटरिंग केले जात असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. संचालन ठाणेदार संग्राम सांगळे यांनी केले.
सनासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा
By admin | Updated: August 11, 2014 23:28 IST