कारंजा: विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २१ उमेदवार मैदानात आहे. त्यात विविध राजकीय पक्षांचे ११ उमेदवार आहेत. त्यात शिवसेना, बहुजन समाज पार्टी , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पार्टी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, बहुजन मुक्ती पार्टी, भारिप बहुजन महासंघ, िप्लझंट अँड वर्कर पार्टी ऑफ इंडिया, कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम.एल) रेड स्टार आदी पक्षांचा समावेश आहे.या व्यतिरिक्त १0 अपक्ष उमेदवारांनीही या म तदारसंघात उमेदवारी लावली आहे. विशेष म्हणजे यात माजी आमदार, विद्यमान जि.प.सदस्यांचाही समावेश आहे. या निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार यावेळी भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. २00९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविणारे उमेदवार आ ता राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अ पक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत २00९ मध्ये भारिपकडून उभे राहिलेले उमेदवार यावेळी बहुजन समाज पार्टीकडून उभे आहेत.
कारंजा मतदारसंघातील लढत चुरशीची
By admin | Updated: October 6, 2014 00:40 IST