कारंजालाड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय १४, १७ व १९ वर्षा आतील शालेय हॅण्डबॉल स्पर्धा कारंजा तालुका क्रीडा येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत जे.सी.हायस्कूलची १४ व १७ वर्षाआतील मुलींची चमू विजयी झाली तर १४ वर्षाआतील मुलांची चमू उपविजयी ठरली. विजयी झालेली मुलींची चमू अमरावती येथे होणार्या विभागीय स्तराकरिता पात्र ठरली असून त्या दोन्ही चमू अमरावती येथे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.१७ वर्षाआतील मुलींच्या विजयी चमुमध्ये अपूर्वा चव्हाण, आदिती अवघन, समिक्षा काळे, वैष्णवी खेडकर, शिवाणी मोडक, वैष्णवी ठाकरे, शिवाणी ढोले, जान्हवी पिंजरकर, वृषाली पळसकर, उ त्कर्षा चर्हाटे, आदिती गावंडे, कार्तिकी गावंडे, दीपाली कदम, निकिता दोनोडे, गौरी ठाकरे, वैष्णवी वानखडे या खेळाडूंचा समावेश होता तर १४ वर्षाआतील मुलींच्या विजयी चमूमध्ये अक्षया सुडके, ओजस्वी घुले, हितेशी लोडाया, कृतिका गाडगे, रियालक्ष्मी कर्वे, सिद्धी निमके, आचल शर्मा, राधा देशमुख, अनुश्री धोटे, देवयानी व्यास, सायली पुंड, केतकी सारसकर, समृद्धी पांचाळ या खेळाडूंचा समावेश होता.
जे.सी.हायस्कूलचा संघ जिल्हा स्तरावर
By admin | Updated: September 20, 2014 22:05 IST