वाशिम : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीची प्रकीया जवळ आली असताना काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस दिसून येत आहे. ३५ इच्छूक उमेदवार आहेत. या इच्छूक उमेदवारापैकी काही उमेदवाराची नावे दिल्लीला पाठविल्याच्या चर्चेने ज्यांच्या नावे पाठविण्यात आली नाहीत त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.काँग्रेसचे नेतृत्व सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे काही जण आरोप करीत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधिच काँग्रेसमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षातर्फेसर्वांना सबुरीचा सल्ला दिल्या जात आहे. १७ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती मुंबई येथे झाल्यात. इच्छूक उमेदवारापैकी काही उमेदवाराची नावे दिल्लीला पाठविल्याच्या चर्चेने ज्यांची नावे पाठविण्यात आली नाहीत त्या इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गंत धुसफूस
By admin | Updated: September 10, 2014 00:28 IST