जऊळका रेल्वे: येथून जवळच असलेल्या किन्हीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या उपकेंद्र कवरदरीत कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकेने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली आहे. यासंदर्भात जउळका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका रामकृष्ण ठाकरे असे मृत कंत्राटी आरोग्य सेविकेचे नाव आहे. ती मुळची मुसळवाडी येथील रहिवासी होती. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास प्रियंकाने आपल्या राहत्या घरी मुसळवाडी येथे वीष प्राशन केल्याचा प्रकार तिच्या कुटूंबियांच्या लक्षात आला. त्यामुळे तिला तातडीने वाशिम येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतू तिथे जिल्हा सामन्य रुग्णालयातील वैद्यकांनी तीला मृत घोषीत केले. याप्रकरणी जिल्हा सामन्य रुग्णालयाच्या वार्ड बॉयने वाशिम शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादिवरुन झीरोची कायमी करण्यात आली. आज जउळका पोलिसांनी याप्रकरणी कलम १७४ नुसार आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. प्रियंकाने वीष नेमके का प्राशन केले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मानलवी व त्याचे सहकारी करीत असल्याची माहिती जउळका पोलिसांनी दिली.
आरोग्य सेविकेची आत्महत्या
By admin | Updated: September 7, 2014 22:55 IST