वाशिम : रिसोड व मालेगाव तालुक्यात घरफोड्या करून धुमाकूळ माजवणार्या टोळीला दोन लाखाच्या मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रिसोड, मोठेगाव, वाकदवाडी, मांगुळ झनक व मालेगाव येथे घरफोड्या करणार्या तीन आरोपिंना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. आरोपीमध्ये विरोधी फुटबॉल पवार, बारक्या इत्तु पवार व परात्या सतार भोसले ( रा. बरटाळा ता. मेहकर) यांचा समावेश आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल व चोरीस गेलेले दोन लाख रूपये किमतीचे दागिणे जप्त करण्यात आले. या आरोपिंनी बुलडाणा, परभणी जिल्ह्यातही चोरी केल्याची कबुली दिली असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस दलाने वर्तविली आहे.
घरफोड्या करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: January 23, 2015 02:00 IST