रिसोड : पैनगंगा नदीच्या पुरामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकर्यांनी तहसीलदार यांना निवेदन देवून नुकसानाची भरपाई देण्याची मागणी ११ सप्टेंबर रोजी केली आहे. तालुक्यामध्ये पैनगंगा नदी काठी असलेल्या शेतामध्ये पुराचे पाणी घुसून सोयाबीनसह इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच काही भागातील सोयाबीन िपकांवर आलेल्या रोगराईमुळे काही शेतकर्यांचे पिक पूर्णपणे वाया गेले आहे. याबाबत प्रशासनाने सर्व्हेक्षण करावे व नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनातून नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
पुरामुळे पिकाचे नुकसान
By admin | Updated: September 12, 2014 23:05 IST