उंबर्डाबाजार : उंबर्डाबाजार ते सोमठाणा मार्गावरील जुन्या सरकारी दवाखान्यासमोरील चवरे यांच्या शेताच्या धुर्यालगत असलेल्या ट्रॉन्सफॉर्मरच्या बॉक्सला २२ एप्रिल रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.या आगीत चवरे यांचे शेताचा अर्धाअधीक धुरा व घोडे पाटील यांचे शेताच्या अर्धाअधिक धुरा जळुन खाक झाला. फ्युज बॉक्समधील साहित्यासह वायरिंग जळुन खाक झाली. चवरे यांचे शेताला उंबर्डाबाजार गावाची लोकवस्ती तर घोडे पाटील यांचे शेताला लागुन इंदिरानगर झोपडपट्टीच्या लोकवस्तीचा भाग लागुन असल्याने ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्टा करुन आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
‘ट्रॉन्सफॉर्मर बॉक्स’ला आग
By admin | Updated: April 23, 2017 00:52 IST