वाशिम : जैन समाजाची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदीराचे दार उघडण्यात यावे या मागणीसाठी येथे सुरू असलेले उपोषण आज तिसर्या दिवशीही सुरूच होते.शिरपूर येथील पार्श्वनाथ मंदिराचे व्दार उघडावे व जमिनीपासून अधर असलेल्या अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मुर्तीच्या पुजनाचा व दर्शनाचा लाभ सर्वांना घेता यावा या मागणीसाठी शिरपूर येथील विनायकराव देशमुख यांनी १८ सप्टेंबरपासून सुरू केलेले उपोषण तिसर्या दिवशी सुरूच होते.
शिरपूर येथे तिस-या दिवशीही उपोषण सुरूच
By admin | Updated: September 21, 2014 00:03 IST