मंगरुळपीर (जि. वाशिम): घराची बांधकाम परवानगी व नकाशाची अफरातफर करुन फसवणुक केल्या प्रकरणी मंगरुळपीर नगर पालिकेचे मुख्याधिकारी व्ही.बी.दातीर यांचे सह कनिष्ठ अभियंता चारुदत्त दंडवते यांचेविरुध्द २१ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी मो.तारेक मो.याकुब रा.बिलाल नगर, रामसिंग वाडी, मंगरुळपीर यांनी पोलिसात तक्रार दिली की, आरोपी व्ही.बी.दातीर मुख्याधिकारी चारुदत्त दंडवते, कनिष्ठ अभियंता नगर परिषद मंगरुळपीर यांनी संगनमत करुन फिर्यादीचे घराची बांधकाम परवानगी व नकाशाची अफरातफर करुन फसवणुक केली. अशा फिर्यादीवरुन पोलिसांनी या दोघांविरुध्द कलम ४२0, ४0९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलिका वतरुळात खळबळ माजली असून चर्चेला ऊत आला आहे.
मंगरुळपीर पालिका मुख्याधिकारी यांच्यासह अभियंत्यावर गुन्हा दाखल
By admin | Updated: January 22, 2015 00:22 IST