रिसोड: रिसोड : शहरवासीयासाठी वरदान ठरत असलेल्या अडोळ धरण प्रकल्पात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिल्यामुळे शहराला दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले असून याबाबत नगरपालिका अलर्ट झाल्याचे चित्र आहे.शहराची सध्य़ा लोकसंख्या ३४ हजाराच्या आसपास आहे. शहरासाठी मानसी ७0 लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दररोज शहराकरीता १२.५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा लागतो. मासिक ३0 जून २0१४ च्या अहवालानुसार अडोळ धरणामध्ये केवळ २९ टक्केच जलसाठा उपलब्ध असून ६ ते ७ टक्के जलसाठा मृत साठा आहे. ते पाणी पिण्याच्या योग्य नाही व तसेच १.२५ एम.एम.क्युब आरक्षित साठा आहे. या पाणीसाठय़ाच्या प्रमाणामुळे पाणी कपातचे संकेत शहरवासीयावर येणार आहे.शहरामध्ये ५ साठवण टाक्या असून यामध्ये १६.६५ दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. शहरामध्ये ८२ हातपंप असून ६१ पंप कार्यान्वित आहे. शहरामध्ये ३,८७४ नळधारक असून ४ औद्योगिक नळ व ४४ व्यापारीधारक नळ कनेक्शन आहे. सद्यस्थितीला रेकार्डनुसार ३९२२ नळ कनेक्शनधारकाची संख्या आहे. शहरवासीयांना एक दिवसाच्या आड पाणीपुरवठा होत आहे.शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण प्रकल्प अडोळ धरणाचा आहे. तदनंतर पिंगलाक्षी देवी तलावातून पाणी पुरवठा करणे बंद आहे.तसेच अमरदास नगर करीता संत अमरदासबाबा संस्थानच्या विहिरीमधून पाणीपुरवठा होत आहे. अतिशय स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा न.प. प्रशासनामार्फत होत आहे. धरणात पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी बचतीबाबत नगर परिषद कठोर भूमिका घेणार आहे.
पावसाने दडी मारल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात घट
By admin | Updated: July 10, 2014 22:41 IST