वाशिम : जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. आचारसंहितेचा भंग करणार्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी सूचना सामान्य निवडणूक निरीक्षक मिनाक्षी सुंदरम यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचार्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या सर्व नोडल अधिकारी, आचारसंहिता पालनाविषयी नियुक्त विविध पथकांच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, वाशिम मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पारनाईक, रिसोड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक अमनकर, सार्वजिनक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.डी. पाडेवार आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड या तिन्ही मतदारसंघात होणार्या राजकीय पक्षाच्या व नेत्याच्या प्रत्येक प्रचार सभेवर निवडणूक यंत्रणेने बारकाईने लक्ष ठेवावे व त्या सभेचे छायाचित्रीकरण करावे. कोणत्याही उमेदवाराकडून मतदाराला पैशाचे वाटप होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. असा प्रकार होत असल्याचे समजताच तत्काळ कारवाई करावी तसेच धार्मिक स्थळे, धार्मिक कार्यक्रम, सण याचा वापर निवडणूक प्रचारासाठी होत असेल तर त्याविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना यावेळी मिनाक्षी सुंदरम यांनी दिल्या.
आदर्श आचारसंहितेचा भंग करणा-यांची गय करू नका!
By admin | Updated: October 3, 2014 00:35 IST