वाशिम : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून, सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे अनेक चर्चांना ऊत येत आहे. सध्या प्रमुख पक्षांची उमेदवारी कुणाला मिळते, याची सर्वांना उत्सुकता असून, सर्वच जण पक्षांच्या उमेदवारीच्या यादीची वाट पाहत आहेत. त्यामुळे व्हॉट्स अँप व अन्य प्रसारमाध्यमांवर विविध पक्षांच्या याद्या झळकत आहेत; मात्र या याद्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून, अफवा पसरविण्यात येत आहे.गत पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेची राज्यातील काही मतदारसंघातील उमेदवारांची यादी व्हॉट्स अँपवर झळकली होती. ही यादी पाहिल्यानंतर राजकीय वतरुळात बरीच चर्चा झाली. अनेकांनी ही यादी व्हॉट्स अँपवर मित्रांना पाठविली. काही इच्छुक उमेदवारांकडेही ती गेली. त्यांनी याची चौकशी केली असता, शिवसेनेने अद्याप कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केली नसून, ही यादी केवळ खोडसाळपणा असल्याचे त्यांना समजले. ही यादी व्हॉट्स अँपवर झळकताच काही उमेदवारांना अभिनंदनाचे फोनही गेले. त्यांनीही ते स्वीकारले. उमेदवारी मिळो अथवा न मिळो, आनंद तर ते घेतच आहेत. व्हॉट्स अँपवरील या फेक उमेदवार याद्यांची शहरातील चर्चा चौका-चौकात बरीच चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे.
व्हॉटस अँपवरील याद्यांची चर्चा
By admin | Updated: September 20, 2014 22:22 IST