वाशिम : विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरला आहे. प्रत्येक पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्याफैरी झडत आहेत. शहरात जागोजागी प्रचाराच्या रिक्षा फि रत असून कल्पकतेने तयार केलेल्या ध्वनीफितींमधून मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. त्याचवेळी एकाच प्रभागातील एका चौकात एका पाठोपाठ दुसरी, तिसरी रिक्षा येऊन थांबली की, या सर्वांच्या होणार्या कल्लाबोलमुळे शहरवासी पार वैतागले आहेत.विधानसभेची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्वाभाविकच उमेदवारांनी प्रचाराचा जोरही वाढविला आहे.आजवर उमेदवारांनी मतदाराच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याची पहिली इनिंग संपविली आहे. आता मतदानाला कमी दिवस उरले असल्यामुळे ह्यडोअर टु डोअर ह्ण फि रण्यापेक्षा उमेदवारांनी तथा त्यांच्या सर्मथकांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या शक्तीस्थळावर हल्ला करण्याचे धोरण अंगीकारले आहे. १३ ऑक्टोंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांना या कर्णकर्कश आवाजाचा सामना करावा लागणार आहे. त्यांनतर मात्र मतदार सुटकेचा निश्वास सोडतील.** ध्वनीप्रक्षेपकांच्या गोंगाटात मतदार मात्र, बाळगले मौनच !विधानसभा निवडणुकीच्या हंगामात आश्वासनांच्या पाण्याने मतदारांच्या मनरुपी जमिनीचे सिंचन करून मतांचे पिक घेऊ पाहणार्या उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविण्यात आघाडी घेतली आहे. ह्यमी कसा चांगला..ह्ण ह्यमाझ्याकडेच कसे विकासाचे व्हिजन आहे..ह्ण एवढेच नव्हेतर ह्यमाझी मतदारसंघाला कशी गरज आहे..ह्ण यासारख्या बाबी भोळ्याभाबड्या मतदारांना पटवून देण्यासाठी उमेदवारांनी रान डोक्यावर घेतले आहे. कुणी रिक्षाच्या ध्वनीक्षेपकातून तर कुणी कॉर्नर सभा, जाहीर सभांमधून मतदारांना टार्गेट करीत आहे. मतदार मात्र, या सर्व गोंगाटातही अद्याप मौनच असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीला अवघ्या दहा दिवसाचा कालावधी उरला असताना मतदार कुणाच्या झोळीत मताचे दान टाकेल याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांचे पुढारी देखील स्पष्ट बहुमताबाबत साशंक असल्याचेच दिसून येत आहे.
‘कल्ला’बोल!
By admin | Updated: October 5, 2014 01:48 IST