वाकद : नजीकच्या धोडप बु. येथील ग्रा.पं. अंतर्गत कामात कमालीचा भ्रष्टाचार झाला असून सरपंचाच्या नातलगांनाच विविध कामाचे लाभ देण्यात आले. त्याबाबत चौकशी करुन सत्य उघडकीस आणण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी रिसोड यांचेकडे दि. ३१ जुलै रोजी केली आहे. त्यानुसार सदर ग्रा.पं.ने मागील वर्षी १५ ऑगस्ट २0१३ ला ग्रामसभा आयोजिली होती. परंतु वेळेवर ग्रामसभा स्थगित करुन बंद खोलीमध्ये ठराव घेण्यात आले व सहय़ा घेण्यात येवून हवे तसे ठराव घेतले. यात ठराविक लोकांनाच लाभ देण्यात आला. तसेच काही सदस्यांचे घरी शौचालये नसूनही ते पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्याबाबत चौकशी करुन अशा सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे. येथील महिला सरपंचाचे दीर अर्जुन बबन थोटे यांना कुकुटपालनासाठी शेड मंजुर करण्यात आला, सासरे सुभाष रामजी थोटे यांना गोठा बांधकाम मंजुर करण्यात आले. सदर बाबींची चौकशी करण्यात यावी व दोषीवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक सचिन गुलाबराव बोडखे, गजानन नारायण बोडखे, संदिप शालीकराम बकाल, माधव लोडजी बोडखे तथा अन्य बहुसंख्य ग्रामस्थांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रा.पं.च्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार
By admin | Updated: August 4, 2014 00:26 IST