वाशिम : विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या जिल्हा प्रशासनाने विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने ५ आक्टोंबरला आयोजिलेल्या सायकल रॅलीला वाशिम शहरवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रॅलीत तरुणाईसह विविध संघटनांच्या पदाधिकारी, सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यामुळे मतदार जागृतीसाठी वाशिमकर एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावरून सुरु झालेल्या या सायकल रॅलीला सामान्य निवडणूक निरीक्षक इंदू धर व निवडणूक निरीक्षक सुखचैन सिंग यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, रिसोडचे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक अमनकर, वाशिमचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पारनाईक, तहसीलदार आशिष बिजवल, बळवंतराव अरखकर, शिवाजी हायस्कूलचे संचालक किरण सरनाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मतदार जागृतीसाठी एकवटले शहरवासी
By admin | Updated: October 6, 2014 00:46 IST