मंगरुळपीर : संत झोलेबाबांच्या पावन स्पर्शाने धन्य झालेल्या चिखली गावाला ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली व पर्यावरण संतुलीत समृद्ध योजनेत सदर ग्रामपंचायत तालुकास्तरावर पात्र ठरली असून, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील संत नगरी ङ्म्रीक्षेत्र चिखली ग्रामपंचायतीला सन २0१२-२0१३ या वर्षाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावरून दिल्या जाणार्या तीन विविध पुरस्कारांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्काराने चिखली गावाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप २0 हजार रोख व प्रमाणपत्र तसेच संत गाडगेबाबा अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये जिल्हय़ातून तिसर्या क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले आहे. या पुरस्काराचे स्वरूप २ लाख रुपये रोख व प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे.
चिखली गावाची दोन पुरस्कारांसाठी निवड
By admin | Updated: September 19, 2014 01:31 IST