वाशिम : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दुकान फोडून रोख रक्कम व मोटारसायकलची चोरी करणारी तीन चोरट्यांच्या टोळीला डिटेक्शन ब्रँचच्या पथकाने ९ जुलैच्या रात्री रंगेहात पकडले. प्राप्त माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लक्ष्मणदास हरचंदाणी यांचे दुकानचे ८ जुलै रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास शटर तोडून तिघांनी दुकानामधील चिल्लर रक्कम १४२१ रूपये लंपास केले. चोरी केल्यानंतर या तिघांनी पुसद मार्गावर असलेल्या पाटणी पेट्रोल पंप येथून रूपेश सुभाष कांबळे यांची एम.एच. ३१ ए.एल. ५३२३ क्रमांकाची सीबीझेड मोटारसायकल घेऊन शहरामधून पसार होऊ लागले. दरम्यान, डिटेक्शन ब्रँचचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक उदय सोयस्कर, पोलिस उपनिरीक्षक रमेश जायभाये, पोलिस उपनिरीक्षक कल्पना राठोड, सुनील पवार, राजेश बायस्कर व हरिष दंदे यांच्या पथकाने रात्रीच्या गस्तीमध्ये या तिघांवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये पुसद येथील शेख समीर शेख अहमद, अयाज अहमद इजाज अहमद व शेख सलिम शेख समशेर यांचा समावेश आहे. या तिघांनीही मोटारसायकल व दुकानामधून रोख १ हजार ४२१ रूपये चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या तिघांविरूद्ध भादंविचे कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.
घरफोड्या करणारी पुसद येथील टोळी जेरबंद
By admin | Updated: July 10, 2014 01:51 IST