नेतन्सा: येथे घरकुलाबाबतच्या इंदिरा आवास, राजीव गांधी निवारा योजना व अन्य योजनांतर्गत विविध लाभार्थ्यांना लाभ मिळाला असला तरी येथील भटक्या जाती, विमुक्त जाती, तसेच इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थी मागील ८ वर्षापासून घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत.स्वत:चे घरकुल असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु घर बांधणे ही मोठी खर्चीच बाब असल्यामुळे ते प्रत्येकाला शक्य नसते. त्यामुळे राज्य शासनाचे वतीने इंदिरा आवास योजना, राजीव गांधी निवारा योजना, रमाई आवास योजना, विविध प्रकारच्या घरकुल योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांमधून आपल्याला लाभ मिळेल अशा अपेक्षीत येथील भटका समाज व इतर मागासवर्गीय समाजातील गरीब व पात्र लाभार्थी आहेत. पण या योजनांमधून या घरकुलांचा लाभ अद्यापही मिळत नसल्याचे चित्र नेतसा येथे दिसून येत आहे. काही भटका समाजाच्या इतर मागास समाजातील्ा नागरिक राहण्यासाठी चांगली घरे नसल्यामुळे मातीच्या आणि कुडाच्या घरात दिवस काढत आहेत.नेतसा येथील भटका समाज व इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर घरकुलाच्या माध्यमातून बांधून द्यावे अशी मागणी नेतसा येथील मातंग समाज भाईचारा समितीचे अध्यक्ष गजानन शिवाजी बाजड व इतर नागरिकांनी केली आहे.
नेतन्सा गाव घरकुलाच्या प्रतिक्षेत
By admin | Updated: August 5, 2014 20:49 IST