वाशिम : शहरातील विविध बँकाँचे असलेले एटीएम सेवा केद्राची सेवा बंद असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार ९ ऑगस्ट रोजी घडली. अनेक ग्राहकांनी शहरातील बर्याच एटीएम सेवा केंद्रावर भेट देवून पैसे निघत नसल्याचे पाहून अखेर खाली हातच परतले. वाशिम शहरातील रिसोड नाक्यावर एकाच ठिकाणी तीन एटीएम सेवा केंद्र आहेत. या ठिकाणी ९ ऑगस्ट रोजी दुपारी मोठया प्रमाणात गर्दी होती. ग्राहक आतमध्ये जावून खाली हात परत येत होता. बाजुलाच असलेल्या दुसर्या व तिसर्या एटीएम मध्येही हीच अडचण असल्याने नागरिकांनी आपला मार्ग शहरातील इतर एटीएमकडे वळविला तिथेही नागरिकांनी आपले एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकल्यानंतर कोणतीही सूचना येत नसल्याने एकच ग्राहक बराच वेळ प्रयत्न करताना दिसून आला व शेवटी खाली हातच परतला. या संदर्भात एटीएम केंद्रावर कार्यरत कर्मचार्याशी विचारणा केली असता आज मशिन स्लो चालत असल्याचे त्यांनी सांगितले. असाच प्रकार जुन्या जिल्हा परिषद समोर असलेल्या स्टेट बँकेच्या, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या स्टेट बॅक, बालाजी कॉम्पलेक्स मधील युनियन बँक एटीएमवर ग्राहकांना हाच अनुभव आल्याने अखेर अनेक ग्राहकांनी कंटाळून पैस काढलेच नाही. यावेळी ग्राहकानी आज सर्वच ठिकाणच्या एटीएममशिनमध्ये बिघाड आहे उदया पैसे काढू असे म्हणून निघून गेले.
वाशिममधील एटीएम सेवा विस्कळीत
By admin | Updated: August 9, 2014 22:42 IST