वाशिम: जिल्ह्यातील शेतकर्यांवर संकटाची मालीका सुरूच असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांपासून तर पिक हाती येईपर्यंत यावर्षी शेतकर्यांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.मृग नक्षत्राला सुरूवात होण्याआधी जिल्हयातील सर्वंच शेतकर्यांनी पेरणीच्या दृष्टीकोनातून शेत तयार करून ठेवले होते. जिल्हयाचे प्रमुख पिक सोयाबीन असल्याने सोयाबीन चे बियाणे मिळविण्याकरीता शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागली. गतवर्षी खरिप हंगामात जास्त व सतत पाऊस पडल्याने सोयाबीनचे पीक भिजल्या गेले व यामुळे सोयाबीनची प्रत खराब होवून उगवण शक्ती कमी झाली. या प्रकारामुळे बियाण्यांची कमतरता भासली. घरी असलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता घरातील कुंडीव्दारे व गोणपटाव्दारे तपासली यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राचे शेतकर्यांना मार्गदर्शन लाभले. कसेबसे बियाण्यांची जुळवाजुळव केली मात्र मृग नक्षत्रात अर्धाअधिक महिना उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नाही यामुळे शेतकर्यांच्या पेरण्या वेळेवर होवू शकल्या नाहीत.मृग नक्षत्रानंतर १७ ते १८ दिवसानंतर पाऊस आला म्हणून शेतकर्यांनी पेरण्या केल्यात. त्यानंतर जी पावसाने दडी मारली की बियाणे जमिनीतून बाहेरचं आले नाही पर्यायी शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी नंतरही पिकांना जीवनदान मिळेल असा पाऊस बरसला नसल्याने अनेक भागातील शेतकर्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढविले. एवढे सर्व असताना नाईलाजाने काही शेतकर्यांनी ठिंबक सिंचनावर पिकांचे संरक्षण केले. लगेचच यानंतर मधात पिकांवर जिवाणू व बुरशीजन्य रोग आला. या संकटातून कसेबसे शेतकरी निघाले नाही तो पिकांवर पिवळा मोझ्ॉक आला व जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात २0 ते १५ टक्के पिकांचे नुकसान केले. या नुकसानीपासून शेतकर्यांना वाचविण्याकरीता कृषी विभागानेही मोलाचे सहकार्य केले परंतु त्याचाही काही फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे.
शेतकर्यांवर संकटाची मालिका कायमच!
By admin | Updated: September 23, 2014 01:11 IST