वाशिम : मृग नक्षत्रापासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यानंतर जिल्हावासीयांवर चांगलाच मेहेरबाण होत आहे. ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सर्वदूर धो-धो पाऊस झाला. यंदा जिल्ह्यात मृग नक्षत्रामध्ये पावसाने तुरळक स्वरुपात हजेरी लावली होती. त्यामुळे पेरणीमध्ये सातत्य नव्हते. काही शेतकर्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. तर काहींच्या अपूर्णच होत्या. त्यानंतर मात्र पावसाने अचानक दडी मारली. परिणामी, याचा फटका पेरण्यांना बसला. पावसाअभावी अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकटही घोंघावू लागले होते. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होण्याबरोबरच जलपातळीत वाढ, पिकांना दिलासा आणि चार्याचा प्रश्नही मार्गी लागण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस
By admin | Updated: September 7, 2014 22:58 IST