वाशिम : व्हॉटस्अँप, फेसबुक, ट्विटर यासारख्या नामांकित अँप्सवरून नेते, पक्ष आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्यांवर आक्षेपार्ह टिपणी, छायाचित्र, चलचित्र टाकलेले आढळल्यास किंवा असे गैरप्रकार समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करून गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार तीन वर्षे कारावास तसेच पाच लाखांच्या दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे. पोलिस यंत्रणा या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात नेत्यांची थट्टा उडविणारी, त्यांची बदनामी करणारी छायाचित्रे, काटरून्स सोशल मीडियावरून फिरविली गेली होती. सर्मथन असलेल्या नेत्यांचे उदात्तीकरण करताना विरोधी नेत्यांची चेष्टा करणारे, बदनामी करणारे मॅसेज अपलोड करण्यात आले होते. रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पुन्हा अशा चुकीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. आता मात्र सोशल मीडियाबाबत पोलिस यंत्रणा अधिक जागृत झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे, असे प्रकार केल्याची बाब सिद्ध झाल्यास शिक्षा भोगावी लागणार आहे.
सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्यास कारवाई
By admin | Updated: October 5, 2014 01:43 IST