वाशिम : येथील काटीवेस परिसरात असलेल्या गोविंद ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानामधील १५ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २0 हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती या प्रकरणाच्या तपास सुरू झाला असून आज १२ सप्टेंबर रोजी ६ संशयिंतांची चौकशी करण्यात आली. वाशिम शहरातील सराफा व्यापारी दीपक नंदलाल वर्मा यांचे काटीवेस परिसरात ह्यगोविंद ज्वेलर्सह्ण मध्ये चोरी झाल्यानंतर दुसर्यादिवशी सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाच्या शटरचे नट बोल्ट काढल्याचे निदर्शनास आल्याने चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. वर्मा यांनी वाशिम शहर पोलिसांना कळविल्यानंतर ताबडतोब घटनास्थळी ठाणेदार संग्राम सांगळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक उदय सोयस्कर यांच्यासह पोलिसांचे व श्वान पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी दुकानामध्ये तपासणी केली . चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पाचारण केलेल्या श्वान पथकाला चोरीचा उलगडा करण्यात यश मिळाले नाही. वर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. १२ सप्टेंबर रोजी मात्र ६ संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून विचारपूस केली, त्यांचे संभाषणाबाब त, त्यांच्या संपर्काबाबत चौकशी करण्यात आली.
६ संशयीतांची चौकशी
By admin | Updated: September 12, 2014 23:08 IST