वाशिम : महिलांचे जीवनमान उंचावण्याच्या उदात्त हेतूने नाबार्ड फायनान्स व स्वयंशासन बहुद्देशीय महिला महिला विकास संस्था वाशिमच्या वतीने जिल्हय़ातील १६ महिला बचत गटांना एकूण ३८ लाख २0 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील ७ महिला बचत गटांना एकूण १६ लाख १0 हजारांचे, मालेगाव तालुक्यातील सहा बचत गटांना एकूण १५ लाख १0 हजारांचे, तर मानोरा तालुक्यातील ३ बचत गटांना एकूण ७ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी स्वयंशासन बहुद्देशीय महिला विकास संस्थेचे संचालक माधवराव इंगोले, नाबार्ड फायनान्सचे जिल्हा व्यवस्थापक उदय नानकर, तसेच संस्थेच्या अध्यक्षा कमल माधव इंगोले यांच्या उपस्थित होत्या.
महिला बचत गटांना ३८ लाखांचे कर्ज वाटप
By admin | Updated: September 10, 2014 00:17 IST