विवेकानंद ठाकरे / रिसोडदरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल वसूल करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी असलेल्या रिसोड येथील महसूल विभागात रिक्त पदांचा आलेख उंचावला आहे. सध्यस्थितीला तलाठी पदे आठ रिक्त असून कोतवालांचेही २0 पदे रिक्त आहेत.तालुक्यामध्ये उजाड गावांसह एकूण गावांचा आकडा १00 च्या घरात आहे. गावाचा महसूल विभागाचा प्रमुख म्हणून तलाठी व तलाठय़ाला सहकारी म्हणून कोतवाल हे महत्वाचे पदे आहे. गावातील शेतीचा आढावा घेण्यासाठी तलाठी व कोतवालावर महत्वपुर्ण जबाबदारी असते. गारपीट, अतवृष्टी, सर्व्हे, निवडणुक, शेतसारा, आम आदमी निराधार योजनेचा अहवाल यासह विविध महत्वपुर्ण बाबी तलाठी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तलाठयांकडे कामाचा बोजा वाढत आहे. तर दुसरीकडे कर्मचार्यांची रिक्त पदे असल्याने कामाचा ताणही वाढत आहे. तालुक्यामध्ये १00 गावाकरिता ८ मंडळ अधिकारी व ४२ तलाठी व ३0 कोतवाल कार्यरत आहे. तहसिल कार्यालयातही रिक्त पदांचा प्रश्न आहे. यामध्ये कार्यालयाअंतर्गत कनिष्ठ लिपीकांचे ६ पदे रिक्त असून १0 पदे कार्यरत आहे व शिपाई यांचे २ पदे रिक्तच आहे. एकूण महसूल विभागात तब्बल ३६ पदे रिक्त आहे. रिक्त पदामुळे प्रशासकीय कामावर विपरीत परिणाम होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.रिसोडचे तहसीलदार अमोल कुं भार यांनी रिक्त पदांमुळे इतर कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून त्यामुळे कामाची गती काही प्रमाणात कमी होत असल्याचे सांगीतले.
महसूल विभागात तब्बल ३६ पदे रिक्त!
By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST