कारंजा- राज्यात होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी, तसेच मतदान ओळखपत्रातील दुरुस्ती संदर्भात राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यानच्या कालावधित कारंजा मतदार संघात एकूण २४६४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत कारंजा मतदार संघात १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान एकूण २८८ मतदारांनी दुरुस्तीसाठी अर्ज सादर केले आहेत. निवडणूक आयोगाकडून यापूर्वी ९ जून २0१४ ते ३0 जून २0१४ दरम्यान मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आली होती. त्या कालावधित कारंजा मतदार संघाच्या मतदार यादीत ४ हजार ९९४ मतदारांचा नव्याने समावेश करण्यात आला. या संदर्भातील यादी ३१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार कारंजा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या २ लाख ८६ हजार २२ झाली होती. आता १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मानोरा तालुक्यात एकूण ४८७ जणांनी, तर कारंजा तालुक्यात एकूण ७५१ जणांनी अर्ज सादर केले आहेत. अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरपर्यंत तयार होणार आहे.
कारंजा मतदारसंघात तब्बल २४६४ नवमतदारांची नोंदणी !
By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST