शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या कालव्यांची दुरूस्ती कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:41 IST

प्लास्टर गेले वाहून : १० वर्षांपासून दुरूस्ती नाही, कालव्यातून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील गावांना सूर्या प्रकल्पातून उन्हाळ्यात कालव्यांअंतर्गत शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, १० वर्षांपासून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरूस्तीच न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणावर नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे यंदाही शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याने कालव्यांच्या पाण्यावर होणाºया शेतीवर परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ५०० हेक्टर जमीन सूर्या कालव्याअंतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाळे, खानीव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटणे, चारोटी, कासा, सारणी, निकावली, उरसे, साये, रानशेत, साखरे, गोवणे,घोळ, दाभोण, वधना, ऐना आदी गावांना तर पालघर तालुक्यातील सोमटा, बºहाणपूर, आंबेदा, नानिवली, चिंचारे, आकेगवहान, रावते, शिगांव, कुकडे, महागाव, गारगाव, गुंदले, वाळवे अशा सुमारे ८५ ते ९० गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. कालव्यातून पाणी गळती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने सर्व माती भरावाचे असलेले कालवे बाहेरून डबर (दगडाने) पिचिंग केले आणि आतील बाजूने बांधकाम तसेच प्लास्टिक करून अस्तरीकरण केले. मात्र, नंतर वेळोवेळी दुरुस्ती न केल्याने बºयाच ठिकाणी कालव्याचे बांधकाम आणि प्लास्टरही पाण्यात वाहून गेले आहे. काही ठिकाणी तर कालव्याचे प्लास्टर आणि बांधकाम पूर्णपणे निघून गेल्याने आतून कालवे ढासळून गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कालव्यातून पाण्याची मोठी गळती होते. कालव्यांना जोडणाºया काही गावांना अपूर्ण पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील बºयाच शेतकºयांनी भातशेती करणे बंद केले आहे. तर गळतीमुळे मुख्य कालव्यातून उपकालव्यांना जोडणाºया शेतीला देखील वेळोवेळी योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे शेतकरी सांगतात.दरम्यान, १२ वर्षांपूर्वी सूर्या प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत सूर्यानगर, पालघर, वाणगांव येथील सर्व कार्यालये बंद करून १०० ते १२० किमी. अंतरावरील कार्यकारी अभियंता भातसा कालवा क्र .१ शहापूर, येथे ती जोडण्यात आली होती. त्यामुळे येथील अधिकारी नियमित दूरवर येऊन कालव्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष देत नाहीत आणि साफसफाईची कामेही होत नाहीत अशी शेतकºयांची तक्रार होती. दरम्यान, शेतकºयांनी वारंवार मागणी केल्याने दोन वर्षांपूर्वी पुन्हा सूर्या प्रकल्पाचे कार्यालय मनोर येथे आणले आहे. तरीही अद्याप परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. याबाबत माहिती घेण्यासाठी जलसंपदा विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.शेतकºयांकडून वेळोवेळी पाणी बिल (पाणीपट्टी) भरूनही दुरूस्तीची कामे होत नसल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सदर कालव्याची दुरूस्ती करण्याची आमची मागणी आहे.-सुरेश घरत, शेतकरी